सुभाष आठले - लेख सूची

कॉलरा, भ्रष्टाचार आणि लोकपाल

माणसांमध्ये नैसर्गिकरीत्या, कॉलऱ्याविरुद्ध प्रतिकारशक्ती जवळपास नसतेच. कॉलऱ्याचे जंतू असलेले पाणी, मग ते विहिरीचे असो, तळ्याचे असो किंवा नदीचे असो; प्यायल्यानंतर जवळपास सर्वांनाच कॉलरा होतो. कॉलरा सहसा कधी एकट्या-दुकट्याला होत नाही. त्याची साथच येते. व्यक्तिशः रुग्णांवर उपचार करून कधी कॉलऱ्याची साथ आटोक्यात येत नाही. प्रथम त्यासाठी माणसांनी कॉलरा-जंतुयुक्त पाणी पिणेच बंद करावे लागते व नंतर आसमंतातच …

राज्यघटनेत सुधारणा

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानसभेत भारताची राज्यघटना मंजूर करून स्वीकारण्यात आली. राज्यघटना अनंत काळपर्यंत तशीच अचल रहावी अशी कल्पना कधीच नव्हती. अनेक वर्षांच्या वापरानंतर या घटनेमधील त्रुटी लक्षात येतील, तसेच काळाबरोबर मानवी जीवनात बदल होत जाऊन, घटनेतही त्यानुसार बदल करावे लागतील, हे अपेक्षितच होते. आजतागायत घटनेत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. पण त्यांचे स्वरूप बहुतेक वेळा …